top of page

अनुभव - 1

Updated: Sep 10, 2020

"श्री"

🙏🙏 जय गजानन 🙏🙏


गजानन महाराज आणि मधमाशा


गजानन विजय ग्रंथाच्या सहाव्या अध्यायात सच्चितानंद स्वरूपाला जाणल्या मुळे मला मधमाशांची बाधा होणार नाही असे महाराजांनी बंकटाला सांगीतलं हे आपण नेहमी वाचतो आणि नंतर महाराज माशांना जाण्याची सूचना करतात व माशा निघून जातात..


मध्यंतरी मधमाशांची एक गोष्ट काही वर्षापुर्वी घडलेली आमचे स्नेही श्री. बाळ थत्ते यांनी सांगीतली अकोला येथील घटना आहे. एका सहनिवासात एक जोशी म्हणून राहतात पहील्या मजल्यावर त्यांचे रहाणे आहे. एकदा गॅलरीत मधमाशानी मोठे पोळे तयार केले माशा घोंगवू लागल्या त्यांनात्या जागेचा वापर बंद करावा लागला पोळे काढ णारे लोक मिळेना मोठ्या मुश्किलीने शेवटी मिळाले तर खूपपैसे मागीतले शिवाय मध आम्ही नेऊ असही म्हणाले ते मान्य केले आणि खूप काळजी घेऊन ती जागा साफ केली. पण थोड्याचदिवसानंतर पुन्हा अजूनच मोठे पोळेतयार झाले जागेचा वापर पुन्हा बंद करावा लागला. आणि आता खूप शोध घेऊनही माणसं मिळत नाहीशी झाली. शेजारी चर्चेचा विषय झाला. माशा घरात शिरतील असं सतत मनावर दडपण..


घरी मुलांची आजी होती तिला नातवंडांची काळजी सतावत होती. आजी गजाननमहाराजांची भक्त.

आणि एक दिवस आजीने हिंमत बांधली सकाळी आरती चे तबक तयार केले आणि आजी गॅलरीत जाऊ लागली .मुलगा म्हणे हे काय करते. आजी म्हणे मला जाऊ दे. मुलगा म्हणे तुला हवं तर तू जा पण निदान तबक नेऊ नको माशा अंगावर येतील. आजी म्हणे मी आणि महाराज काय ते पाहून घेऊ.आणि हट्टाने आजी गॅलरीत गेल्या दार लोटून घेतले. काही मिनिटे शांततेत आणि दडपणाखाली गेली. आणि थोड्या वेळाने आजी आत आल्या...दार पुन्हा लावून घेतले... आणि थोड्या वेळाने सगळे आपल्या कामाला लागले...


संध्याकाळी बेल वाजली म्हणून दार उघडून पाहिले तर बाजूच्या इमारतीत राहणारी एक व्यक्ती दारात हजर. ती विचारू लागली माशांना घालवण्यासाठी पुन्हा पैसे दिलेत का?सगळे आश्चर्य चकीतच झाले आणि विचारू लागले..माशा गेल्या?? ती व्यक्ती म्हणे अहो मला दिसल्या नाहीत म्हणून तर मी आलोय..दार उघडून पाहिले तर माशा खरंच निघून गेल्या होत्या..सर्व आजी ला विचारूलागले आजी तु काय जादू केली? आजी चे डोळे भरून आले. आजी म्हणे ही माझ्या गजानन महाराजांची किमया...मी त्यांना कळवळून प्रार्थना केली आणि आरती ओवाळून सहाव्या अध्यायातील मधमाशांचा प्रसंग आठवा आणि आमच्या वर कृपा करा अशी मनोभावे विनंती केली..आजीचे पुढील शब्द आजीला आलेल्या हुंदकयात विरून गेले...


जयंत वेलणकर...9422108069

आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.

🙏🙏 जय गजानन 🙏🙏


...........................................

*समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज उपासना*

शांतीरस आणि भक्तीरसपूर्ण मनःशांती प्रदान करून गजानन महाराजांची भक्ती प्रदान करणारी उपासना. ऐका आणि सोबत स्वतः म्हणा. संध्याकाळी सातच्या सुमारास अनेक ठिकाणी ही उपासना सुरू आहे. गुरुवारी आणि एकादशी ला तर मोठीच पर्वणी.ऐका ... उपासना लिंक... https://youtu.be/WxKZ91xsve8

...........................................










Recent Posts

See All
🌺अनुभव १५०

"श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १५०) नांदतो देव हा आपुल्या अंतरी जय गजानन! समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन...

 
 
 
🌺अनुभव १४९

................. "श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १४९) तू सर्वव्यापी सर्वेश्वर! जय गजानन! गजानन महाराज समाधिस्त झालेत त्या गोष्टीला...

 
 
 

2 Comments


जय गजानन श्री गजानन शुभ सकाळ माऊली

Like

ravi.girhe
Jun 04, 2020

उत्कृष्ट मांडणी

Like

9892909088

©2020 by Vijaya Mahavir Bhattad. Proudly created with Wix.com

bottom of page