top of page

अनुभव - 4

Updated: Jun 8, 2020

" श्री "

*🙏 जय गजानन 🙏*

* गजानन महाराजांनी दिली संतत्वाची प्रचिती.

संत परम कृपाळु असतात. जगाची वागण्याची रीत कशीही असली तरी संत कृपादृष्टीनेच पाहतात याचा अनुभव गजानन महाराजांनी मला दिला. लहानपणा पासून माझा देवावर विश्वास नव्हताच असं जरी म्हणता येणार नाही तरी,मी देवाला कधिही नमस्कार करायचो नाही असं म्हणायला हरकत नाही. फार काय मी परभणी गावात ज्या त्रिमुर्तीनगर भागात राहतो तिथे शेजारीच म्हणजे अगदी घराला लागुनच गजानन महाराजांचे मंदिर आहे तिथे देखील मी कधी गेलो नाही. वास्तविक 1989 ला माझ्या शेजारीच श्रीमान लंगर सरांनी संत गजानन महाराज मंदिराचे बांधकाम सुरू केले. मला सरांनी वारंवार विनंती केली की बांधकामासाठी पाणी लागेल तुम्ही पाणी द्या पण मी सरळ टाळले. 1990 पासून मंदिरात विविध कार्यक्रम सुरू झालेत माझं राहणं शेजारीच, लंगर सर मला ऋषिपंचमी आणि प्रगट दिनाची पत्रिका द्यायचे,पण कधिही कार्यक्रमाला तर नाहीच नाही प्रसाद घेण्यासाठिही मंदिरात गेलो नाही.....

असा मी..रमेश काशिनाथ जोशी. फाॅरेस्ट डिपारमेन्ट मधे बरेच वर्ष नोकरी झाल्यानंतर मी निवृत्त झालो. माझं लहानपण जळगाव जिल्ह्यांत गेलं. साधारणपणे मी चौथ्या वर्गात असताना आईने मला प्रथमच शेगांवला नेले. त्यावेळी मंदिर अतिशय लहान होते. आजूबाजूला कौलारू धर्मशाळा होत्या. त्यावेळी बालसुलभ मनानी मी महाराजांना जो काही नमस्कार केला तो माझ्या तर स्मरणात नाही राहीला पण कदाचित त्यांच्याजवळ मात्र त्याची नोंद झाली असावी.

मला दोन मुलं आहेत. इ.स.2004 मधे माझ्या मोठ्या मुलाचं ,राहूलचं लग्न झालं. त्यानंतर स्वाभाविकपणे आम्ही गोड चाहूलिची वाट पाहु लागलो,परंतु तशी काही चिन्ह दिसेनात ,म्हणून आम्ही डाॅक्टरांचे मत घेतले. डाॅक्टरांनी विपरीत मत दिल्यामुळे आमच्या मनावर दडपण वाढलं मग अनेक डाॅक्टरांकडे गेलो आणि सर्व प्रकारच्या टेस्ट केल्या परंतु टेस्टट्यूब बेबी या तंत्रज्ञानाचा वापर केला तरी देखील मुल होणार नाही असा निष्कर्ष त्यांनी काढला आणि आमचा सर्व परिवार अत्यंत निराश झाला.

माणसावर कठीण प्रसंग आला की त्याला देव आठवतो. या सर्व घडामोडीत मधल्या काळात मी आणि माझ्या परिवारानी मुक्ताईनगर येथील शालिनी अंबा आई यांचा गुरूमंत्र घेतला. त्या मुळच्या गजानन महाराज भक्त आहेत त्यांनी शेगांवच्या पायी वारी केल्या आहेत. गजानन महाराजांची भक्ति हाच त्यांचा मुळ आधार आहे.

मी महाराजांपासून दूर होतो परंतु लहानपणी आईने माझे नाव शेगांवला नोंदवल्या मुळे मी त्यांच्या दृष्टीक्षेपातच होतो.महाराजांची कृपादृष्टी असली की ते आपल्या नकळत योग्य मार्गानी संत दासगणूंनी गजानन अष्टकात म्हटल्या प्रमाणे "अलास जगी लावण्या परतुनी सुवाटे जन " या ओळीचा प्रत्यय दिल्याशिवाय राहत नाही.

आमच्या गुरूमाऊलींनी सुन बाईच्या कानात कानमंत्र दिला,त्या नुसार रोज रात्री 3.30 वाजता आंघोळ करायची या वेळी आकाशात शुक्राचे दर्शन घ्यायचे व एका पायावर ऊभे राहून श्री गजानन महाराजांच्या लहान पोथीचे 108 पारायण करायचे,आणि 19 पोर्णिमेला मुक्ताईनगर येथील रेणुका देवी अथवा माहूर च्या देवीचे दर्शन घ्यायचे असे सांगीतले.

या नुसार सुन बाईने पारायण सुरू केले व मी दर पोर्णिमेला मुक्ताईनगर ला जाणे सुरू केले. सर्व कुटुंबाचे मन एकाच गोष्टीकडे केन्द्रीत झाले होते. मनात प्रत्येक जण महाराजांना प्रार्थनाही करीत होता आणि....

सुनबाईचा 108 पारायणाचा दिवस उजाडला. त्याच दिवशी तिने प्रकृती विषयक तक्रार केल्याने तिला दवाखान्यात न्यावे लागले,सोनोग्राफी करावी लागली आणि...रिपोर्ट पाॅझीटीव्ह आला. 24.11.2008 ला मला नातू झाला.

त्या दिवशी माझे डोळे आनंदाने भरून आले,कदाचित अष्टसात्विक भाव वगैरे काय म्हणतात ते दाटून आले असतील. मनात गुरूमाऊलीला नमस्कार केला आणि त्या माध्यमातून गजानन महाराजांनी संतत्वाची प्रचिती देऊन मला जवळ केलं म्हणून मनोमन त्यांच्या चरणी लीन झालो.

आता वयाची पासस्ट वर्ष पूर्ण झालीत. वयाच्या पन्नास पंचावन्न पर्यंत देवळात न जाणारा मी आता मात्र दिवसाचा बराचसा वेळ तिथे बसलेला असतो. तेव्हा प्रसादालाही न जाणारा मी आता मात्र महाराजांच्या उत्सवाच्या प्रसादासाठी लोकांना अगदी अंतःकरणापासून आमंत्रण देत असतो..

.... जय गजानन ...

अनुभव..रमेश काशिनाथ जोशी..

शब्दांकन...जयंत वेलणकर..9422108069..

....

आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असतील तर स्वागत आहे..

Recent Posts

See All
🌺अनुभव १५०

"श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १५०) नांदतो देव हा आपुल्या अंतरी जय गजानन! समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन...

 
 
 
🌺अनुभव १४९

................. "श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १४९) तू सर्वव्यापी सर्वेश्वर! जय गजानन! गजानन महाराज समाधिस्त झालेत त्या गोष्टीला...

 
 
 

Comments


9892909088

©2020 by Vijaya Mahavir Bhattad. Proudly created with Wix.com

bottom of page