अनुभव 6
- Jayant Velankar
- Jun 1, 2020
- 6 min read
Updated: 3 days ago
Reposted on 3/7/2025
" श्री “
गजानन महाराज की जय! (🌺अनुभव ६)
पारायण दुबईला,नैवेद्य मुंबईला, नमस्कार पोहोचतो शेगांवला!
जय गजानन!
मी शैलेश.! चार पांच वर्षांपूर्वीची ही गोष्ट!
त्या दिवशी मी माझ्याच तंद्रीत रस्त्यावर फिरत होतो. खरं सांगायचं तर त्या काळात मी लोकांना असं बरेच वेळा माझ्या तंद्रीत फिरताना आढळायचो. माणसावर जेव्हा प्रचंड मानसिक दडपण असतं तेव्हा तो त्याची समस्या तर विसरत नाहीच पण त्या समस्येमुळे स्वतःला मात्र विसरतो. तसा विचार करता माझ्या समोरील समस्या ही एका अर्थाने 'मीच ओढवून घेतलेली' असं त्या समस्येचं वर्णन करता येईल. मला अगदी अल्प पगाराची नोकरी होती. तसं पाहता एकट्या करीता तो पैसा ठीक होता. पण त्या मुळेच मला भविष्याचा अंदाज करता आला नाही आणि तारुण्यावर स्वार झालेल्या मला,मुंबईच्या ज्या भागात आम्ही राहायचो तेथील 'नेहल ' पत्नी म्हणून योग्य वाटली तिलाही मी नवरा म्हणून योग्य वाटलो आणि आमचं लग्न झालं. मुलगी झाली, आणि मला वास्तवाचं भान आलं. माझ्या पगारात संसाराचा गाडा रेटणं कठीण आहे, आपण काही तरी करणं क्रमप्राप्त आहे. दुसरी नोकरी शोधायलाच हवी. याची तीव्रतेनी जाणीव झाली आणि दुष्काळात तेरावा महिना माझी ती असलेली नोकरी सुटली. आता तर दुसरी नोकरी मिळवायलाच हवी. मी अगदी युद्धपातळी वर त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केलेत. पण कुठेही यश आले नाही. तशात कुणी तरी मला सुचविले की आपल्या इकडे नोकरी शोधण्यापेक्षा तू दुबई ला का नाही नोकरी शोधत?ही दुबईची कल्पना डोक्यात जाऊन मी वेड्यासारखा त्या मागे लागलो. पाच पन्नास ठिकाणी अर्ज टाकलेत, रिझ्यूम पाठविले पण कुठेच जमले नाही. अगदी हाता तोंडाशी घास यायचा आणि निसटून जायचा. मग मी पण जिद्दीला पेटलो आणि विझिटिंग व्हिसा घेऊन एक महिना चक्क दुबईत जाऊन राहिलो. वणवण फिरलो पण नकार घंटा ऐकून पूर्णपणे हताश झालो, तुटून गेलो आणि हात हालवत मुंबईला परतलो. जीवन जगणं कठीण वाटू लागलं.मनात नको ते विचार घर करू लागलेत.अशा या मनाच्या अवस्थेत मी रस्त्यावर चालत असता, मला मागून माझ्या एका मित्राने आवाज दिला. रस्त्याच्या कडेला असलेल्या बाकावर आम्ही बसलो..
मित्राने खांद्यावर हात ठेवला आणि तो बोलू लागला. शैलेश गेल्या काही दिवसांपासून मी तुला एक गोष्ट सांगण्याचा विचार करतो आहे. तू गजानन महाराजां विषयी काही ऐकलं आहेस का? विदर्भातील शेगांव येथील समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज! त्यांच्यावर संत कवी दासगणू महाराजांनी ' गजानन विजय ' नावाचा ग्रंथ लिहीला आहे. महाराजांची महती सांगणारी ती पोथी अतिशय रसाळ आणि गजानन भक्तांची प्रिय आहे. अनेकांना त्या पोथी विषयी फार चांगला अनुभव आला आहे. तुला नम्रपणे सांगतो,ती पोथी तू संकल्पासह मनापासून वाच. गजानन महाराजांना मार्ग दाखविण्याची प्रार्थना कर आणि बघ काय होतंय ते.
मी त्यावर त्याला म्हणालो. अरे बाबा मी प्रयत्न तर करतोच आहे नं? बरं, कुठले ते विदर्भातील शेगांवचे गजानन महाराज? मी राहतो या मुंबईला आणि मला नोकरी हवी दुबईला,काय होणार आहे?कसं जुळणार हे सूत्र? माझे प्रश्न ऐकून मित्र म्हणाला. बघ बाबा, मला आतून वाटलं म्हणून मी प्रामाणिकपणे बोललो आता बाकी महाराजांची इच्छा! असं बोलून तो चालू लागला. दूर चालत जाणाऱ्या मित्राकडे मी पाठमोरा पहात राहिलो. पण मनात त्याचं बोलणं कुठे तरी खोलवर रूजलं. रात्र बेचैनीत घालवल्या नंतर दुसरे दिवशी सकाळीच मित्राच्याच सहाय्याने गजानन विजय ग्रंथाची प्रत प्राप्त केली आणि महाराजांचा फोटोही! मित्राने सांगितल्या प्रमाणे महाराजांच्या चरणाला पोथी लावून मनापासून संकल्प केला आणि तीन दिवसांचं पोथीचं पारायण दृढ निश्चयाने पूर्ण केलं. या घटनेला काहीच दिवस लोटले असतील आणि महाराज मला पावले. दुबईला एका कंपनीत अडतीस लोकांमधून माझं सिलेक्शन होऊन मला नोकरी लागली. मी नोकरीवर रुजूही झालो.. पण.
नोकरीला प्रारंभ झाल्यावर असं लक्षात आलं की १० ते १२ तासाची रोज ड्युटी आणि महिन्यातून फक्त एकच सुट्टी! अतिशय कष्टाचा जाॅब. तशात मी तिथे सव्वा वर्ष पूर्ण केलं. कंटाळून गेलो आणि मला पुन्हा आठवण झाली. गजानन विजय ग्रंथाची, गजानन महाराजांची!
मी ग्रंथ सोबत नेला होताच. मग काय पुन्हा महाराजांना प्रार्थना केली. नोकरीतील बदला साठी आर्जव केले आणि संकल्पासह पुन्हा तीन दिवसांचं पारायण भक्ती भावानं पूर्ण केलं. काहीच दिवसांनंतरची गोष्ट असेल, संध्याकाळी मी आणि माझा सहकारी, ऑफिसात माझ्या नोकरी विषयी बोलत होतो. एक अनोळखी पोक्त गृहस्थ त्यांच्या काही कामानिमित्त तिथे आले होते. त्यांना मी या आधी तिथे कधीही पाहिले नव्हते. त्या दिवशी ड्यूटी संपल्यावर ते मला बाहेर भेटले, त्यांनी मला विचारलं..' नौकरी ढूंढ रहे हो? दुबईमेही अच्छी नौकरी चाहीये? मी म्हटलं हां! त्यांनी मला एक पत्ता दिला आणि म्हणाले ' कल इस पते पर चले जाना!
आता पुढे काही बोलण्याची गरज आहे? गजानन महाराजांच्या कृपेने, मी जुनी नोकरी सोडून भारतात परतलो आणि थोड्या विश्रांतीनंतर आता नवीन ठिकाणी रुजू झालो आहे.
मात्र आता एक फरक असा झाला आहे की जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी दुबईला गजानन विजय ग्रंथाचं पारायण करतो. पारायण पूर्ण होतं त्या दिवशी मुंबई ला कळवून तिथे महाराजांना पिठलं भाकरीचा नैवेद्य अर्पण होतो आणि शेगांवच्या गजानन महाराजांना प्रार्थनापूर्वक नमस्कार केल्या जातो. दुबई ..मुंबई ..शेगाव . एका सूत्रात महाराजांनी छान बसवून दिलं आहे. त्यामुळे त्यावेळी घेतलेल्या माझ्या बालिश शंकेवर मीच ओशाळतो आणि दुबईहून मी व मुंबईहून पत्नी दोन्ही ठिकाणाहून नमस्कार मात्र शेगांवच्या दिशेने करतो
आणि हो, प्रत्येक पारायणाच्या वेळी..बंडू तात्याला महाराजांनी केलेला उपदेश स्मरणात घेतो. "अरे हताश कधी होऊ नये, प्रयत्न करण्यास चुकू नये."! मात्र प्रयत्न करताना म्हणत असावे. श्रीगजानन! जय गजानन! श्रीगजानन! जय गजानन!
🌺अनुभव. शैलेश वावीकर. मुंबई.
शब्दांकन..जयंत वेलणकर 9422108069.
🌸आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.
अवश्य वाचाल श्रीगजानन अनुभव पुस्तक भाग एक, दोन व तीन. सहयोग राशी प्रत्येकी मात्र पन्नास रुपये(एमेझाॅन वर उपलब्ध)
गजानन महाराजांवरील भक्तीत वाढ होऊन भक्त महाराजांकडे वळावेत व महाराजांनी सर्वांचं भलं करावं!या उद्देशातून प्रसिद्ध केलेली ही पुस्तकं आपण संबंधितांना भेट पण देऊ शकाल. जय गजानन.
" श्री "
गजानन महाराज की जय.
* पारायण दुबई ला.,नैवेद्य मुंबई ला...नमस्कार पोहोचतो शेगांव ला *
नमस्कार...
मी शैलेश.! चार पांच वर्षापूर्वीची ही गोष्ट.!
त्या दिवशी मी माझ्याच तंद्रीत रस्त्यावर फिरत होतो. खरं सांगायचं तर त्या काळात मी लोकांना असं बरेच वेळा माझ्या तंद्रीत फिरताना आढळायचो. माणसावर जेव्हा प्रचंड मानसिक दडपण असतं तेव्हा तो त्याची समस्या तर विसरत नाही पण त्या समस्येमुळे स्वतःला मात्र विसरतो. तसा विचार करता माझ्या समोरील समस्या ही एका अर्थाने मीच ओढावून घेतलेली असं त्या समस्येचं वर्णन करता येईल. मला अगदी अल्प पगाराची नोकरी होती. तसं पाहता एकट्या करीता तो पैसा ठीक होता. पण त्या मुळेच मला भविष्याचा अंदाज करता आला नाही आणि तारुण्यावर स्वार झालेल्या मला,मुंबईच्या ज्या भागात आम्ही राहायचो तेथील 'नेहल ' पत्नी म्हणून योग्य वाटली तिलाही मी नवरा म्हणून योग्य वाटलो आणि आमचं लग्न झालं. मुलगी झाली, आणि मला वास्तवाचं भान आलं. माझ्या पगारात संसाराचा गाडा रेटणं कठीण आहे, आपण काही तरी करणं क्रमप्राप्त आहे दुसरी नोकरी शोधायलाच हवी याची तीव्रतेनी जाणीव झाली आणि दुष्काळात तेरावा महिना माझी ती नोकरी सुटली. आता तर दुसरी नोकरी मिळवायलाच हवी. मी अगदी युद्ध पातळी वर त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केलेत पण कुठेही यश आले नाही,तशात कुणी तरी मला सुचविले की आपल्या इकडे नोकरी शोधण्या पेक्षा तू दुबई ला का नाही नोकरी शोधत? मग मी वेड्यासारखा त्या मागे लागलो. पांच पन्नास ठिकाणी अर्ज टाकलेत,रिझ्यूम पाठविले पण कुठेच जमले नाही. अगदी हाता तोंडाशी घास यायचा आणि निसटुन जायचा. मग मी पण जिद्दीला पेटलो आणि विझिटिंग व्हीसा घेऊन एक महिना चक्क दुबईत जाऊन राहिलो. वण वण फिरलो पण नकार घंटा ऐकून पूर्णपणे हताश झालो,तुटून गेलो आणि हात हालवत मुंबई ला परतलो. जीवन जगणं कठीण वाटू लागलं,मनात नको ते विचार घर करू लागले,अशा या मनाच्या अवस्थेत मी रस्त्यावर चालत असता मला मागून माझ्या एका मित्राने आवाज दिला. रस्त्याच्या कडेला असलेल्या बाकावर आम्ही बसलो...
मित्राने खांद्यावर हात ठेवला आणि तो बोलू लागला. शैलेश गेल्या काही दिवसांपासून मी तुला एक गोष्ट सांगण्याचा विचार करतो आहे. तू गजानन महाराजां विषयी काही ऐकले आहे का? विदर्भातील शेगांव येथील समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज! त्यांच्यावर संत कवी दासगणू महाराजांनी ' गजानन विजय ' नावाचा ग्रंथ लिहीला आहे. महाराजांची महती सांगणारी ती पोथी अतिशय रसाळ आणि गजानन भक्तांची प्रिय आहे. मी तुला नम्रपणे सांगतो,ती पोथी तू संकल्पासह मनापासून वाच. गजानन महाराजांना मार्ग दाखविण्याची प्रार्थना कर आणि बघ काय होतंय ते..
मी त्यावर त्याला म्हणालो....अरे बाबा मी प्रयत्न तर करतोच आहे नं? आणि कुठले ते विदर्भातील शेगांव चे गजानन महाराज? मी राहतो या मुंबई शहरात.!आणि मला नोकरी हवी दुबई ला,काय होणार आहे?कसं जुळणार हे सुत्र? माझे प्रश्न ऐकून मित्र म्हणाला. बघ बाबा मला आतून वाटलं म्हणून मी प्रामाणिकपणे बोललो आता बाकी महाराजांची इच्छा! दूर चालत जाणार्या मित्राकडे मी पाठमोरा पहात राहिलो पण मनात त्याचं बोलणं कुठे तरी खोलवर रूजलं. रात्र बेचैनीत घालवल्या नंतर दुसरे दिवशी सकाळीच मित्राच्याच सहाय्याने गजानन विजय ग्रंथाची प्रत प्राप्त केली आणि महाराजांचा फोटोही! मित्राने सांगितल्या प्रमाणे महाराजांच्या चरणाला पोथी लावून मनापासून संकल्प केला आणि तीन दिवसांचं पोथीचं पारायण दृढ निश्चयाने पूर्ण केलं. या घटनेला काहीच दिवस लोटले असतील आणि महाराज मला पावले. दुबई ला एका कंपनीत 38 लोकांमधून माझं सिलेक्शन होऊन मला नोकरी लागली. मी नोकरीवर रुजूही झालो...पण.....
नोकरीला प्रारंभ झाल्यावर असं लक्षात आलं की 10 ते 12 तासाची रोज ड्युटी आणि महिन्यातून फक्त एक सुट्टी! अतिशय कष्टाचा जाॅब.तशात मी तिथे सव्वा वर्ष पूर्ण केले. कंटाळून गेलो आणि मला पुन्हा आठवण झाली..गजानन विजय ग्रंथाची,गजानन महाराजांची.!
मी ग्रंथ सोबत नेला होताच,मग काय पुन्हा महाराजांना प्रार्थना केली. नोकरीतील बदला साठी आर्जव केले आणि संकल्पासह पुन्हा तीन दिवसांचं पारायण भक्ती भावाने पूर्ण केले. काहीच दिवसा नंतरची गोष्ट असेल,संध्याकाळी मी आणि माझा कलीग ऑफिसात माझ्या नोकरी विषयी बोलत होतो एक अनोळखी पोक्त गृहस्थ त्यांच्या काही कामानी तिथे आले होते. त्यांना मी या आधी तिथे कधीही पाहिले नव्हते. त्या दिवशी ड्युटी संपल्यावर ते मला बाहेर भेटले, त्यांनी मला विचारलं..' नौकरी ढूंड रहे हो?. दुबईमेही अच्छी नौकरी चाहीये? मी म्हटलं हां! त्यांनी मला एक पत्ता दिला आणि म्हणाले ' कल इस पते पर चले जाना!
आता पुढे काही बोलण्याची गरज आहे? मी जुनी नोकरी सोडून भारतात परतलो आणि आता नवीन ठिकाणी रुजू झालो आहे.
मात्र आता एक फरक असा झाला आहे की जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी दुबई ला पारायण करतो. पारायण पूर्ण होतं त्या दिवशी मुंबई ला कळवून तिथे महाराजांना पिठलं भाकरीचा नैवेद्य अर्पण होतो. दुबई ..मुंबई ..शेगाव . एका सूत्रात महाराजांनी छान बसवून दिलं आहे त्या मुळे माझ्या शंके वर मीच ओशाळतो ..आणि दुबई मुंबई या दोन्ही ठिकाणाहून नमस्कार मात्र शेगांव च्या दिशेने होतो..
आणि हो प्रत्येक वाचनाच्या वेळी..बंडू तात्याला महाराजांनी केलेला उपदेश स्मरणात घेतो..' अरे हताश कधी होऊ नये,प्रयत्न करण्यास चुकू नये..'! जय गजानन श्री गजानन....!
अनुभव.. शैलेश वावीकर...मुंबई.
शब्दांकन..जयंत वेलणकर..9422108069.
....आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असतील तर स्वागत आहे.......................
Comentarios