top of page

अनुभव १३४ 🌺

Updated: Oct 6, 2020

" श्री " गजानन महाराज की जय *पशुही ज्याने आकळिला*

जय गजानन! आमच्या घरी माझ्या आईसाठी ' शेगांवचे गजानन महाराज ' हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय! आमचं राहणं खामगावला. खामगाव शेगांव हे अंतर तसं फक्त सतरा किलोमीटर. त्यामुळे शेगांव आमच्यासाठी घरांगण! गेली जवळपास पाच वर्षं झालीत, आई दर एकादशीला पहाटे चार वाजता शेगांवला मंदिरात हजर असते. आईचा एक महिला ग्रुप आहे. त्या सर्व आठ दहा महिला एकादशीला पहाटे तीन वाजता उठतात आणि गाडीने शेगांवसाठी प्रयाण करतात. हे सर्व अशासाठी सांगितलं की आईच्या अशा भक्तीतूनच माझ्यामधेही गजानन महाराजांची भक्ती करण्याची प्रेरणा जागृत झाली आणि मीही गजानन महाराजांचं स्मरण करू लागलो, गजानन विजय वाचू लागलो आणि त्या सर्वाचा माझ्या आयुष्यात मला फार मोठा आधार मिळत गेला. इ.स.२००८ साली गजानन महाराजांनी माझ्यावर आलेल्या एका भयंकर आणि भितीदायक संकटातून मला वाचवलं. तो प्रसंग आठवला की आजही माझ्या अंगावर काटा उभा राहतो . गजानन विजयच्या नवव्या अध्यायात गजानन महाराजांनी गोविंद बुवा टाकळीकरांचा व्दाड घोडा शांत केल्याचा प्रसंग आहे. त्या प्रसंगाचं सुंदर वर्णन दासगणू महाराजांनी केलं आहे. ... घोडा गोविंद बुवाचा / शेगांवासी ठाऊक साचा/ कोश अवघ्या खोड्यांचा/ भीत होते त्यासी जन! अशा द्वाड घोड्याला महाराजांनी सांगितलं... तू शिवाच्या समोरी/ याचा विचार काही करी/ वागत जावे बैलापरी/ त्रास न देई कवणाते/ ऐसे त्यासी बोलून/ गेले निघून दयाघन/ कृपा कटाक्षे करून/ पशुही ज्याने आकळिला! अर्थात महाराजांच्या कृपाकटाक्षाने अत्यंत द्वाड असा पशुही, शांत होतो. महाराजांचं प्रभुत्व जनावरांवरही कसं आहे, याचा अनुभव मला आला. आजही वरील ओव्या गजानन विजय मधे नजरेसमोर येतात तेव्हा त्या प्रसंगाची आठवण झाल्यावाचून राहत नाही. मला आठवतं ते उन्हाळ्याचे दिवस होते. एक दिवस आमच्या खामगावच्या वृत्त पत्रांमधून एक बातमी झळकली, तिचा आशय साधारण असा होता. '" खामगावात पिसाळलेल्या माकडाचा हैदोस " मागील काही दिवसांपासून खामगावातील जोशी नगर, गोपाळनगर, केशवनगर, अंबिकानगर वगैरे भागात एका पिसाळलेल्या माकडाने रस्त्यावर हैदोस घातला असून, लोकांमधे दहशतीचे वातावरण पसरले असून लोक भयग्रस्त झाले आहेत. हे माकड उंच आणि धिप्पाड असून दिसायला भयावह आहे असं प्रत्यक्षदर्शींचं मत आहे. ते पागल असून पिसाळलेलं असल्यामुळे कुणावरही हल्ला करीत आहे. अंगावर उडी मारून खाली पाडणे, ओरबाडणे, डोकं फोडणे, मांडीचा लचका तोडणे, अशा भयंकर स्वरूपाची कृती करीत असल्यामुळे, लोकांनी घाबरून उन्हाळा असूनही बाहेर गच्चीवर न झोपता घरात झोपण्यास प्रारंभ केला आहे. आता पर्यंत अनेकांवर त्याने हल्ला केला असून वनविभागाला लोकांनी तक्रार केली असून वनविभाग देखील त्याला पकडण्याच्या प्रयत्नात आहे. " ही बातमी शब्दशः खरी होती. मी भूषण पवार, खामगावला जोशी नगर येथेच माझं राहणं आहे. त्यामुळे मी या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार होतो. माझ्या परिचयात आणि मित्रावर हल्ला करून त्या माकडाने त्यांना क्षतीग्रस्त केलं होतं. खामगावच्या त्या भागात एक प्रकारे कर्फ्यूच लागला होता. लोक घाबरून घरात बंद होते. तो गुरुवार होता. त्या संध्याकाळी मी आणि माझा मित्र सुदाम, आम्ही दर गुरुवारी ' सुटाळपुरा ' येथील गजानन महाराज मंदिरात नित्य नियमाने जायचो. तसे त्याही गुरुवारी आम्ही मंदिरात गेलो होतो. दर्शन घेऊन परत येताना, एका ठिकाणी झाडाच्या खाली खूप लोक लाठी काठी घेऊन जमा झाले होते. झाडावर ते माकड होते. हल - कल्लोळ ऐकून ते अधिकच बिथरले होते. मित्र त्याच्या घराकडे परतला. माझा परतीचा रस्ता त्याच झाडाखालून होता. पण कुणीतरी सुचविलं की बाजूच्या रस्त्याने जा. त्याप्रमाणे मी माझी सायकल त्या मार्गाने वळविली. एवढ्यात त्या माकडाने झाडावरून खाली उडी मारली, लोक सैरावैरा पळू लागले. त्यापैकी एक जण मी ज्या रस्त्याने जात होतो त्या बाजूने जोरात धावू लागला, ते पागल माकड त्या माणसाच्या मागे धावू लागले. तो माणूस जीवाच्या आकांताने पळत सुटला. मी मागे पहात, मधेच समोर बघत वेगाने सायकल चालवू, लागलो. त्या माकडाने त्या माणसाच्या अंगावर उडी मारली, त्याला खाली पाडलं, जखमी केलं. तो माणूस जोरात कळवळला. आता त्या माकडाचा मोर्चा माझ्याकडे वळला. मी गजानना धाव, गण गण गणांत बोते ,म्हणत वेगाने पायडल मारू लागलो, पण ते माकड माझ्या अगदी जवळ येऊन ठेपले. आता त्याची पुढील उडी थेट माझ्या अंगावर येणार, हे समजून चुकलो. डोळे मिटले, पुढील गंभीर प्रसंग निश्चित होता. मी गच्च डोळे मिटले अन् जोरात ओरडलो. गजानन महाराज की जय! काही क्षण मधे गेलेत पण मला वाटलं तसं काहीच झालं नाही. मी हळूच डोळे उघडले. ते माकड अचानक बाजूच्या घराकडे निघून गेले होते. महाराजांनी त्याचा मार्ग अचानक वळवला होता. घरी येऊन पोहोचलो तो माझी छाती धडधड होत होती. दोन मिनिटांनी जरा शांत झाल्यावर आईला घडलेला प्रसंग सांगितला,त्यावर आई म्हणाली, गोविंद बुवांचा द्वाड घोडा महाराजांनी शांत केला तेव्हा गोविंद बुवांनी महाराजांची केलेली स्तुती मला आठवते. .. "अचिंत्य जगताप्रती, कृती तुझी न कोणा कळे.असो खलही केव्हढा, तव कृपे सुमार्गी वळे! " महाराजांनी ऐनवेळी माकडाचा मार्ग वळवून तुझं रक्षण केलं. थांब, आपल्यावरील मोठं संकट टळले आहे. मी महाराजांसमोर दिवा लावून उदबत्ती ओवाळते. आई दिवा लावित असताना मीही महाराजांसमोर उभा झालो आणि आई उदबत्ती ओवाळीत होती तेव्हा मी पण आई सोबत बोलता झालो... श्री गजानन! जय गजानन! श्री गजानन! जय गजानन!

🌺अनुभव-- भूषण पवार, खामगाव शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069

🌸 आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे. अवश्य वाचा!! श्रीगजानन अनुभव!! *भाग एक* यात एकूण बावन्न अनुभव आहेत फक्त रुपये पन्नास *भाग दोन* यात एकूण बावन्न अनुभव आहेत(५३ ते १०४ ) फक्त रुपये पन्नास ..........................................

.........................................

...........................................

*समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज उपासना*

शांतीरस आणि भक्तीरसपूर्ण मनःशांती प्रदान करून गजानन महाराजांची भक्ती प्रदान करणारी उपासना. ऐका आणि सोबत स्वतः म्हणा. संध्याकाळी सातच्या सुमारास अनेक ठिकाणी ही उपासना सुरू आहे. गुरुवारी आणि एकादशी ला तर मोठीच पर्वणी.

ऐका ... उपासना लिंक... https://youtu.be/WxKZ91xsve8

...........................................





Recent Posts

See All
🌺अनुभव १५०

"श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १५०) नांदतो देव हा आपुल्या अंतरी जय गजानन! समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन...

 
 
 
🌺अनुभव १४९

................. "श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १४९) तू सर्वव्यापी सर्वेश्वर! जय गजानन! गजानन महाराज समाधिस्त झालेत त्या गोष्टीला...

 
 
 

Kommentare


9892909088

©2020 by Vijaya Mahavir Bhattad. Proudly created with Wix.com

bottom of page