श्री गजानन विजय ग्रंथ व आत्मचिंतन
- Jayant Velankar
- Jun 1, 2020
- 5 min read
Updated: Sep 10, 2020
"श्री "
जय गजानन
गजानन विजय ग्रंथ वाचन आणि आत्मचिंतन
पारायण करीत असताना आपलं मन भरकटतं आणि पोथी डोक्यात शिरत नाही. म्हणायला पारायण होतं पण आवश्यक ते चिंतन होत नाही. किती पारायणं झालीत हे महत्वाचं असलं तरी पारायणं कशी झालीत हेही तितकंच महत्वाचं ठरतं. या दृष्टीतून आपणच आपल्याला मदतरूप ठरून आपलं आत्मचिंतन व्हावं या शुध्द हेतूने..
एक अभिनव उपक्रम आपण सुरू करीत आहोत.
विजय ग्रंथावर आधारित वस्तूनिष्ठ प्रश्न ( Objective type) रोज अकरा प्रश्न अकरा दिवस ११ × ११= १२१ प्रश्नांची उत्तरं आपणास द्यावयाची आहेत.
ठळक मुद्दे
÷ यात विचारलेल्या प्रश्नाला चार पर्याय असतील.
÷ आपण योग्य पर्याय निवडावा
÷ अकरा प्रश्नांची एकदा आपण उत्तर दिल्यास आपण सबमिट (SUBMIT) वर क्लिक करावे आणि नंतर व्ह्यू स्कोअरवर (VIEW SCORE) क्लिक करावे. हे आपल्याला आपली सर्व उत्तरे आणि अचूक उत्तरे देखील दर्शवेल.
÷ लगेच आत्मचिंतन करून पुढील वेळी पोथी वाचनात आवश्यक ती सावधानता बाळगून वाचन सूरू.
.........................................
या उपक्रमाकडे आपुलकीने पाहून प्रयत्न समजून घ्या. शक्य आहे की यात नजरचुकीने, अनावधानाने, कधी प्रिंटीग मिस्टेक होऊन एखादी चुक असूही शकेल. लक्षात आणून दिल्यास दुरूस्त करता येईल.
आपले प्रयत्न महाराजांच्या चरणी समर्पित.
श्री गजानन विजय ग्रंथ व आत्मचिंतन - भाग -11 Date : 12/7/2020
सुरू करूया, येथे क्लिक करा
श्री गजानन विजय ग्रंथ व आत्मचिंतन - भाग -10 Date : 11/7/2020
सुरू करूया, येथे क्लिक करा
श्री गजानन विजय ग्रंथ व आत्मचिंतन - भाग -9 Date : 10/7/2020
सुरू करूया, येथे क्लिक करा
श्री गजानन विजय ग्रंथ व आत्मचिंतन - भाग -8 Date 09/07/2020
सुरू करूया, येथे क्लिक करा
श्री गजानन विजय ग्रंथ व आत्मचिंतन - भाग -7 Date: 08/07/2020
सुरू करूया, येथे क्लिक करा
श्री गजानन विजय ग्रंथ व आत्मचिंतन - भाग -6 Date: 07/07/2020
सुरू करूया, येथे क्लिक करा
श्री गजानन विजय ग्रंथ व आत्मचिंतन - भाग -5 of 11 Date: 06/07/2020
सुरू करूया, येथे क्लिक करा
श्री गजानन विजय ग्रंथ व आत्मचिंतन - भाग -4 of 11 Date: 05/07/2020
सुरू करूया, येथे क्लिक करा
श्री गजानन विजय ग्रंथ व आत्मचिंतन - भाग -3 of 11 Date: 04/07/2020
सुरू करूया, येथे क्लिक करा
श्री गजानन विजय ग्रंथ व आत्मचिंतन - भाग -2, Date: 3/7/2020
सुरू करूया, येथे क्लिक करा
श्री गजानन विजय ग्रंथ व आत्मचिंतन - भाग -1 of 11, Dated : 02/07/2020
सुरू करूया, येथे क्लिक करा
अभिप्राय आणि प्रोग्रामचे विश्लेषण --Dated- 23/7/2020
विश्लेषण आणि अभिप्राय वाचण्यासाठी क्लिक करा --
https://docs.google.com/presentation/d/1FuWmmzWppCJmeoCzcaZ1K8sRATJwQyyZWu6WFqBb4I0/edit?usp=sharing
पारायण म्हणजे काय?
आपले गुरु, संत किंवा देव ह्यांच्या अधिकृत चरित्राचे, स्वेच्छेने, शुद्ध अंतःकरणाने, शांत चित्ताने, शुचिर्भूत राहून शक्यतो एका आसनांवर बसून, पूर्णपणे रममाण होऊन केलेले वाचन-पठन करणे, संताची खरी ओळख करून घेणे, त्यांचे चरित्र, त्यांची शिकवण समजून घेणे आणि त्यांनी सांगितलेल्या / दाखवलेल्या नीतीच्या मार्गावर चालण्याचा पुरेपूर प्रयत्न करणे म्हणजेच पारायण. खाली दिलेल्या गोष्टीसारखा हेतू मनात ठेऊन केलेले संतचरित्राचे वाचन पारायण होत नाही
• केवळ दुसरा करतो म्हणून केलेले वाचन • दुसऱ्याची वाहवा मिळवण्यासाठी केलेले वाचन • दुसर्या पेक्षा लवकर वाचतो हे दाखवण्यासाठी स्पर्धात्मक वाचन. भक्तिमार्गात स्पर्धेला जागा नाही • केवळ प्रसिद्धीसाठी केलेले वाचन • मानधन व पैसा घेऊन केलेले वाचन • बोध किंवा शिकवण न घेता केलेले वाचन
आपण गजानन विजयचं पारायण करतो, अनेक वेळा केलं आहे. पोथी वाचत असताना कधी कधी मनात अन्य विचार येऊन मन भरकटतं आणि पोथी डोक्यात शिरत नाही. आपलं चित्त पोथीवर स्थिरावून मनात महाराजांविषयीचं चिंतन व्हावं या उद्देशाने हा उपक्रम आहे.
आपणच आपल्याला मदतरूप ठरून गजानन विजय ग्रंथ अधिक चांगल्याप्रकारे समजावून घेणं हा आपला या मागे हेतू आहे. जर प्रश्नाचं उत्तर आलं तर आपला विश्वास वाढेल. न आलं तर आपण अधिक लक्ष देऊन वाचन करू. प्रश्न खूप गहन नाही .त्याचं उत्तर पोथीतच मिळणार आहे.
Question Bank
1) गजानन विजय ग्रंथात पाटील कुळातील अनेकांचा उल्लेख आहे. सर्व प्रथम कुणाचा उल्लेख आला आहे?
2)गजानन विजय ग्रंथात पहिल्या अध्यायात रामचंद्र पाटील यांचा उल्लेख आहे नंतर अध्याय वीस व अध्याय एकवीस मधे त्यांचा पुन्हा उल्लेख आला आहे.
मात्र त्या आधी पोथीत त्यांचा ओझरता अगदी थोडक्यात उल्लेख आला आहे. कुठे, केव्हा?
3)गजानन विजय ग्रंथानुसार त्या काळी शेगांवला आठवडी बाजार कोणत्या वारी भरत असे, तो वार कोणता?
4) गजानन महाराजांनी सुकलाल अग्रवालची द्वाड गाय गरीब केल्याचं आपण वाचतो.
गजानन विजय मधे असे अनेक प्रसंग आहेत की जिथे बैलगाडी अथवा बैलांशी महाराजांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध आला आणि चमत्कार घडला. यावर आपण विचार केला आहे का?
असे किती प्रसंग आपल्याला आठवतात?
5)श्रीगजानन विजय ग्रंथात Shri Swami समर्थांचा उल्लेख कुठे आला आहे?
6)श्रीगजानन विजय ग्रंथानुसार बंकटलालालाचे वंशज अजुनही कोणतं व्रत करतात?
7)श्रीगजानन विजय ग्रंथानुसार अशा दांभिक पूजनाचे फलही त्याच स्वरूपाचे असे वर्णन कुठे आणि कुणाच्या संदर्भात आले आहे?
8)श्रीगजानन विजय ग्रंथानुसार बंकटलालाकडे लक्ष्मी कोणत्या कारणामुळे स्थिरावली?
9)भास्करपाटलाने ब्रम्हगिरी गोसाव्याचा कोणता हात पकडला
10)श्री गजानन विजय वाचित असताना, महाराजांच्या आशिर्वादाने ग्रंथाच्या अंतरंगात शिरण्याचा प्रयत्न केला तर, गजानन महाराजांच्या आशिर्वादाने अधिकच बहरलेली दासगणूंची प्रतिभाशक्ती शब्दागणिक आणि ओवीगणिक जाणवते आणि लक्षात येतं,अशा कित्येक ओव्या आहेत की ज्यांचं विश्लेषण म्हणा किंवा रसग्रहण करण्याचा प्रयत्न केला तर त्यामागे असलेल्या विविध छटा मनाला जाणवून जातात.
वानगीदाखल एक ओवी इथे मांडतो. गोष्टीचा संदर्भ लक्षात घेता त्यातून काही वेगळ्या छटा तुम्हाला जाणवतात का?त्या ओवीच्या अंतरंगात शिरलो तर एकाच ओवीतून किती वेगवेगळ्या गोष्टी दासगणू सांगून जातात हे काही जाणवतं का बघा यावर विचार करा.
(अध्याय पंधरा/श्रीधर काळे)
पश्चिमेचा मावळला/ तोच पुर्वेकडे आला/ विचार सूर्य त्याचा भला
11) संत भूमीवरी सर्वांचं रक्षण करती जरी गुणांप्रमाणे प्रत्येकाशी वागती...
असा गजानन विजय मधे उल्लेख आहे. त्या नुसार,पुढे महाराजांनी एका प्रसंगात एका भक्ताशी अध्यात्मिक गुढतेवर बोलणं टाळलं आहे आणि वरून तू यात पडू नको असा सल्ला दिला आहे. महाराजांच्या त्या भक्तांचं नाव काय?
12)गजानन विजय ग्रंथामधे लंकेची पार्वती ही उपमा कुणी कुणाला दिली आहे?
13)गजानन महाराजांच्या भक्ताने हताश होऊ नये हा संदेश गजानन विजय मधे कुठे आला आहे?
14)श्रीगजानन विजय ग्रंथानुसार भक्ती मार्गात कोणत्या गोष्टी विषेश मह्त्वाच्या आहेत?
15)गजानन महाराजांचे दोन भक्त
दोन्ही भक्तांच्या आयुष्यातील फार मोठी घटना
घटनेचा महिना वेगळा
घटनेची तिथी एक
प्रश्न-- ते दोन भक्त कोण
ती घटना कोणती
ती तिथी काय
16)गजानन विजय वाचताना आपल्याला जाणवतं की महाराजांच्या बोलण्यात मिश्किलता होती ( विनोदी पध्दतीने बोलणं) आज आपण अशा चार पाच प्रसंगांची यादी करून पाहू की जिथे महाराजांनी विनोदी पध्दतीने संभाषण केले आहे.
17)गजानन महाराजांचा भक्त, ज्याचा उल्लेख पोथी मधे प्राणांतानंतरही दोन वेळा आला आहे.
कोण तो भक्त आणि कुठले ते प्रसंग?
18)महाराजांनी पुंडलिक भोकरे वर आलेलं गंडांतर टाळलं त्याला अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून वाचवलं.
पण महाराज असतानाच एवढ्या मोठ्या घटनेला कुणी केवळ योगायोग म्हटलं.
कुणी केला असा उल्लेख ?*
19)श्रीगजानन विजय ग्रंथात, संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री गजानन महाराज यांच्यात समान संदर्भात एकत्र उल्लेख कुठे कुठे आला आहे?*
गजानन विजय ग्रंथ अधिक चांगला समजण्यात आपलीच आपल्याला मदत व्हावी या शुध्द हेतूने हे प्रश्न होते.
या उपक्रमातून एक जाणवलं की आपली किती पारायणं झालीत हे महत्वाचं आहेच पण पारायण कसं झालं हेही तितकेच महत्त्वाचे आहे. नाही का? आपला उद्देश आत्मचिंतन हा होता. यातून तो कितपत साध्य झाला हे ठरविण्याचा आधिकार आपला आहे. एकूण उपक्रमातील या प्रश्नोत्तरांचा उपयोग आपण गजानन विजय वाचकांच्या हितार्थ सहर्ष करू शकता. अन्य काही सूचना हितगुज या साठी स्वागत आहेच.
...........................................
*समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज उपासना*
शांतीरस आणि भक्तीरसपूर्ण मनःशांती प्रदान करून गजानन महाराजांची भक्ती प्रदान करणारी उपासना. ऐका आणि सोबत स्वतः म्हणा. संध्याकाळी सातच्या सुमारास अनेक ठिकाणी ही उपासना सुरू आहे. गुरुवारी आणि एकादशी ला तर मोठीच पर्वणी.ऐका ... उपासना लिंक... https://youtu.be/WxKZ91xsve8
...........................................
जय गजानन🙏काका,खूप छान उपक्रम ,त्यामुळे आपले वाचन फक्त वाचनाचं होते हे लक्षात आले,खूप गोष्टी समजून आल्या,या बद्दल आभारी आहे,,🙏यानंतर ही असेच उपक्रम जरूर घेऊन या,
महाराज तुम्हाला खूप उदंड आयुष्य आरोग्य देवो हीच सदिच्छा.
सौ राधिका मोहन आचरेकर..
🌺🙏 नमस्कार आणि
जय गजानन🙏🌺
अत्यंत - स्तुत्य उपक्रमात ... भक्तीमय वातावरणात .... घेऊन जाण्यासाठी ... महाराजांनी आपल्याला ... आमच्यासाठी ~ माध्यम केले ... अन आत्मचिंतनात , भक्तिरसांत -- आम्हा उभयतांना न्हाऊ घातले !! माझ्या बहिणीने , मैत्रिणींनीही प्रश्नावली - आनंदाने सोडविली !! #परमानंद !! उत्तरोत्तर उत्कंठा वाढविणाऱ्या प्रश्नावली साठी तुम्ही कित्ती सखोल अभ्यास व परिश्रम घेतलेत हे पदोपदी जाणवले !! आभार दिलसे !!🙏...
श्रद्धा , निष्ठा - सबळ असली की - अनुभती , प्रचिती येतेच - हा आम्हा कुटुंबियांचा अनुभव !!!
महाराजांची सेवा अखंड घडावी व त्यांची कृपादृष्टी आजन्म राहावी !! *महाराज माझें जवळी राहावे !!* -- अखंड ऋणांत ...!!
🌹🙏🌺🙏🌺🙏🌹
सौ. विशाखा विजय गोखले ...
सर्वात आधी वेलणकर काका तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि मनापासून नमस्कार
अतिशय स्तुत्य आणि आत्मपरिक्षण करायला लावणारा असा हा उपक्रम होता. आपण या भक्तीरुप सागरामध्ये कुठे आहोत , हे समजण्यास खूप मदत झाली यामुळे. असेच खूप छान उपक्रम तुम्ही आमच्यासाठी येत असता, आणि येत राहाल यात शंका नाही. महाराज तुम्हाला उदंड आयुष्य देवो
रोज नवनवीन उपक्रम राबवून आपण सर्व भक्तांना नेहमीच पोथीशी संबंधीत प्रश्न विचारता व सर्वजण त्यामुळे पोथी वाचन करतात.फारच छान .गण गण गणात बोते.
अकरा प्रश्नांची एकदा आपण उत्तर दिल्यास आपण सबमिट (SUBMIT) वर क्लिक करावे आणि नंतर व्ह्यू स्कोअरवर (VIEW SCORE) क्लिक करावे. हे आपल्याला आपली सर्व उत्तरे आणि अचूक उत्तरे देखील दर्शवेल.