चातुर्मास नाम जप साधना - 2020 -चातुर्मास नाम जप सांगता (चातुर्मास समाप्ती)
- Jayant Velankar
- Jun 13, 2020
- 4 min read
Updated: Jan 23, 2022
"श्री"
🙏जय गजानन
चातुर्मास नाम जप साधना २०२०,जप संख्या
जय गजानन!हे चातुर्मास नाम जप साधनेचे पाचवे वर्ष होते.
मागील चार वर्ष समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज उपासना केन्द्रांतर्फे महाराजांनी उपासकांकडून अनुक्रमे, सव्वा सहा कोटी, तेरा कोटी, पंचावन्न कोटी अकरा लाख, आणि एकशे अकरा कोटी एकावन्न लाख असा जप करून घेतला. पण मागील वर्षी महाराजांच्या योजनेत काही वेगळं होतं.
चातुर्मास नाम जप साधनेत सहभागी झालेल्या उपासकांच्या माहितीसाठी या वर्षीची माहिती थोडक्यात सादर!
१.. वास्तविक २०२० मधे अधिक मासामुळे एक महिना जास्त होता. जपसंख्या वाढेल असा अंदाज होता पण अन्य स्थिती विपरीत असल्याने तसं झालं नाही.
२.. नाम जप समर्पण सोहळा झाला की वृत्त कथन करू असा विचार होता पण कार्यक्रम होऊ शकला नाही.
३.. आपण दरवर्षी शेगांवला जाऊन महाराजांच्या चरणी जप समर्पित करतो. यंदा ते होऊ शकलं नाही.
४.. जून, जुलै महिन्यात फाॅर्म वाटप झाले तेव्हा करोना प्रकरण वेगात होतं त्यामुळे फाॅर्म अनेक ठिकाणी व्यवस्थित पोहोचले नाहीत.
५.. पोस्टाने फाॅर्म इथून निघाले पण मुंबई कडील भागात प्रतिनिधी पर्यंत गेले नाहीत.
६.. काही ठिकाणी प्रायव्हेट कुरीअरने लोकांशी संपर्क केला नाही.
७.. देऊळ बंद मुळे शेकडो फाॅर्म जे उपासकांना डायरेक्ट मिळाले असते ते मिळू शकले नाहीत.
८.. उपासना केन्द्र बंद मुळे उपासकांचा सहभाग आणि त्यांच्या माध्यमातून जाणारे फाॅर्म गेले नाहीत.
९.. मात्र असं असुनही साठ सत्तर गावांमध्ये फाॅर्म पोहोचले.
१०.. व्हाट्सअॅप द्वारे अनेकांशी संपर्क साधला पण त्याला काही मर्यादा आहेत.
११.. पाचवं वर्ष असल्याने भव्य पालखी सोहळा आयोजन कल्पना होती. त्यासाठी मागील वर्षी रथसप्तमीला अगदी शेगांवला आहे तसा रजत मुखवटा महाराजांच्या कृपेने तयार करून घेतला आहे.
१२.. आता शेगांवला आहे तशी पालखी व्हाईट मेटलमधे तयार करून घ्यायची आहे. या विषयी आपण काही जाणत असल्यास कृपया अवश्य माहिती द्यावी.
१३... वरील सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदा व्हाट्सअॅप वर जप कळवा असे सांगितले होते अनेकांनी जप संख्या कळविली काही फाॅर्मस पण पोहोचलेत
१४.. यंदा महाराजांच्या कृपेने एकूण जप संख्या शंभर कोटी इतकी आहे.
१५.. जेव्हा गजानन महाराज करवून घेतील तेव्हा जप समर्पण सोहळापण होईल आणि शेगांवला जप महाराजांच्या चरणी समर्पित करण्यात येईल.
असो! एकूण विपरीत बाह्य परिस्थिती मुळे वृत्त कथनास उशीर झाला हे खरं, पण महाराजांच्या इच्छेनेच सर्व होतंय तेव्हा समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय!
जयंत वेलणकर
9422108069
Posted on 18-3-2021 on whatsapp.
.......................
"श्री "
🙏जय गजानन
चातुर्मास नाम जप सांगता (चातुर्मास समाप्ती)
आपण सर्व गजानन महाराज भक्त या चातुर्मासात "गण गण गणांत बोते " या सिध्द मंत्राचा जप करीत आहोत. दिनांक २६ नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी. आता चातुर्मास संपणार. स्वाभाविकच सर्वांच्या मनात प्रश्न असेल की आपण केलेल्या जपाचं समर्पण कसं करावं?
प्रत्येक उपासकाने स्थल काल परत्वे या विषयी निर्णय करावा. अर्थात सोबत कुणी नसेल तर एकट्याने, अथवा आठ दहा लोकांनी एकत्र येऊन,पाच पन्नास लोकांनी एकत्र येऊन नाम जप सांगता करावी. ( थोडक्यात आजची परिस्थिती लक्षात घेऊन)
चातुर्मास नाम जप सांगता करताना पुढील पध्दतीने जप समर्पित करावा.
1) सर्वांनी प्रथम गण गण गणात बोते चा एक माळ जप (108) करावा. हा जप झाला की
2) सर्वांनी सामुहिकपणे पुढील प्रार्थना करावी.
" समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या कृपेने,आशीर्वादाने आणि प्रेरणेने या चातुर्मासात आम्ही सर्व उपासकांनी 'गण गण गण गणांत बोते 'या सिध्द मंत्राचा यथाशक्ती जप केला. आज आम्ही हा जप विनम्रपणे महाराजांच्या चरणी अर्पण करतो आणि आम्हा सर्व उपासकांवर कृपादृष्टी ठेवून,त्यांनी सर्व विश्वाचं कल्याण करावं अशी त्यांना प्रार्थना करतो.
3) ह्या प्रार्थने नंतर सर्वांनी " अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधीराज योगीराज परब्रह्म सच्चीदानंद भक्त प्रतिपालक शेगांव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय " असा जयघोष करून आपल्या जवळ प्राप्त झालेले जपाचे फाॅर्म महाराजांच्या चरणी अर्पण करावे.
हे सर्व केवळ दहा मिनीटात पार पडेल. त्यामुळे या सोबत आपल्याला अजून काय करता येईल याचा निर्णय संबंधितांनी घ्यावा. मात्र निदान वरील प्रमाणे तीन टप्प्यांत नाम जप समर्पण करावे.
ह्या नंतर आपण किती जप केला ते ज्यांच्या माध्यमातून फाॅर्म घेतला त्यांना कळवावे व अशा सर्व गट प्रमुखांनी ही संख्या नागपूरला कळवावी.
शेवटी सर्व जप एकत्र जोडून शेगांवला समर्पित करण्यात येईल. व एकूण जप संख्या जाहीर करण्यात येईल.
२६ नोव्हेंबर नंतर आठ दिवसात फाॅर्म जमा करून लवकरात लवकर जप समर्पण कार्यक्रम करावा. नागपूरला हा कार्यक्रमजेव्हा आणि जसा होईल त्या प्रमाणे माहिती प्रसिद्ध होईल.
जयंत वेलणकर
9422108069
🙏 जय गजानन..
---------------------------------------------------------------
"श्री "
🙏जय गजानन
चातुर्मास नाम जप साधना
गण गण गणांत बोते चा जप (वर्ष पाचवे) 🌺
नाम जपाचा हा पाचवा चातुर्मास.
मागील चार चातुर्मासात महाराजांनी आपल्याकडून भारतात आणि भारताबाहेरही चढत्या संख्येने जप करवून घेतला.
*आपण व्यवस्थित करून ठेवलेल्या नोंदीप्रमाणे
२०१६ ला सव्वा सहा कोटी
२०१७ ला सव्वा तेरा कोटी
२०१८ ला पंचावन्न कोटी अकरा लाख
२०१९ ला एकशे अकरा कोटी एकावन्न लाख जप झाला.
या चातुर्मासात किती जप होईल ते महाराजांवर सोपवून आपण गजानन महाराजांच्या स्मरणात जप करू या.
यंदा म्हणजे २०२० चा चातुर्मास १ जुलै आषाढी एकादशीला सुरू होत असून २६ नोव्हेंबर कार्तिकी एकादशीला समाप्त होत आहे. जप नोंदणी फाॅर्म साठ पेक्षाही अधिक ठिकाणी स्पीड पोस्ट ने रवाना झाले आहेत.
सोबत फाॅर्मची पीडीएफ देत आहे, ज्यात जपाविषयी विस्तृत माहिती आपणास मिळेल.
ज्या गावी फाॅर्म पाठविले आहेत ती नावे व त्यांचे फोन नंबर्स फाॅर्मच्या मागील पानावर आहेत तिथे आपण चौकशी करू शकता. एकूण चार पानी फाॅर्म आहे. नाम जप साधना फाॅर्मची पीडीएफ सोबत पाठवित आहे.
पीडीएफ वरून फाॅर्मचे प्रिन्ट आउट काढून घ्या. झेराॅक्स वापरली तरी चालेल. फाॅर्म नाहीच मिळाला तर स्वतंत्र वहीत जप नोंद करूनही चालेल . चातुर्मासाच्या शेवटी आपण केलेल्या जपाची माहिती योग्य ठिकाणी सांगण्यास विसरू नका. जप होणं महत्वाचे आहे. ज्याला, जिथे, जसा, जेवढा जप सहजपणे करणे शक्य आहे तेवढा जप करून रोज त्याची नोंद ठेवा. हा मेसेज समोर पाठवायचा झाल्यास कृपया पीडीएफ सकटच समोर पाठवा म्हणजे प्रत्येकाला सोईचे होईल. फाॅर्म वर अगदी नामजप समर्पण प्रार्थनेपर्यंत सर्व माहिती देण्यात आली आहेच.
या शिवाय काही आवश्यक वाटलेच तर आपण विचारू शकता.
🙏जय गजानन
जयंत वेलणकर 9422108069
PDF File:
कृपया आपले मित्र आणि नातेवाईकांना फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर अग्रेषित करण्यास विसरू नका.
गण गण गणात बाेते मंत्राचा राेज जप करते.
मी नामजप करते रोज। जय गजानन
मी नामजप करीत आहे।जय गजानन🙏
आम्ही सर्व मैत्रिणी 15ते20जणी नामजप करीत आहोत.जय गजानन श्री गजानन.
मी नाम जप करीत आहे