श्री गजानन महाराजांचं आवडतं भजन
- Jayant Velankar
- Jun 11, 2020
- 1 min read
Updated: Jan 23, 2022
चंदन चावल बेल की पतीया हे भजन गजानन महाराजांचं आवडतं भजन हे आपण वाचलं आहे.
पुढील ओळीमध्ये शब्द आहेत ए दुःख मेरा हरो, तसं तर नेहमी करीताच पण आजच्या काळात तर विशेष करून महाराजांची आळवणी करण्याकरिता उत्कृष्ट भजन आहे . हे भजन महाराजांना ऐकवताना सोबत आपणही भाव ओतून म्हणू शकलो किंवा ते शक्य नसेल तर भजन ऐकत महाराजांसमोर बसलो तर आपली प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या शिवाय राहणार नाही.
कृपया महाराजांसमोर निवांत बसून त्यांना अवश्य ऐकवा(संध्याकाळी केवळ समई च्या प्रकाशात अजूनच छान) शक्य होईल तर स्वतः पण सोबत म्हणा पहा काय अनुभव येतो ते.
गजानन महाराज सर्वांचं कल्याण करोत. जय गजानन
आज मुद्दाम दोन गोष्टी या सोबत पठवतो आहे.
१) चंदन चावल बेल की पतीया हे भजन लिखीत स्वरुपात.
२) लता मंगेशकरांच्या आवाजात भजन.--
श्रींचे आवडते भजन
चंदन चावल ...
भोलेनाथ हे दिगंबर
दुख मेरा हरो रे
चंदन चावल बेल की पतिया
शिवजीके माथे धरो रे
अगर चंदन का भस्म चढाऊ
ते शिवजी के पय्या पडो रे
नंदी उपर स्वर भये रामा,
मस्तकी गंगा धरो रे
शिवशंकर को तीन नेत्र है,
अद्भुत रुप धरो रे
अर्धांग गौरी, पुत्र गजानन,
चंद्रमा माथे धरो रे
आसन डाल सिंहासन बैठे,
शांती समाधी धरो रे
कांचन थाली कपुरे की बाटी,
शिवजी की आरती करो रे
मीरा के प्रभु गिरीधर नागर,
चरनोंमे शिष्या धरो रे
कृपया आपले मित्र आणि नातेवाईकांना फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर अग्रेषित करण्यास विसरू नका.
हे भजन खूप उत्तम आहे यात शंकाच नाही. पण काही शब्द चुकीचे असल्याने काही ठिकाणीं त्याचा अर्थ बदलत आहे. तरी एकदा चेक करून पुन्हा पाठवावे ही विनंती.
माझी फार दिवसांची इच्छा पूर्ण झाली .. या भजनाचे शब्द मिळाले. चार पाच गायकांच्या आवाजात हे भजन इंटरनेट वर ऐकल आहे. पाठ करायची खूप इच्छा आहे ... महाराजांना हे माझ्याकडून पाठ करून व म्हणून घ्यायची इच्छा दिसतेय. खूप खूप आनंद झाला ... लिखित स्वरूपात मला सापडत नव्हते... धन्यवाद !