top of page

चातुर्मास नाम जप साधना-2021

Updated: Jul 11, 2021


"श्री"

🙏जय गजानन


समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज उपासना केन्द्र. चातुर्मास नामजप साधना वर्ष सहावे ,खालील लिंक वर आपण आपलं नाव नोंदवू शकता.

२० जुलै आषाढी एकादशी पासून सुरु होत असलेल्या चातुर्मासात आपण गजानन महाराजांचे भक्त 'गण गण गणांत बोते ' या सिध्द मंत्राचा रोज यथाशक्ती जप करणार आहोत हे आपण जाणतोच.या जपाची नोंद करणे सोईचे जावे या उद्देशाने आपण एक लिंक तयार केली आहे. ज्यांना या पद्धतीने नाव नोंदविणे सोईचे वाटते त्यांनी यावर आपलं नाव, मोबाईल नंबर, पिनकोड आदी नोंद करून ठेवली म्हणजे पुढे दर महिन्यात विशिष्ठ लिंक वर आपण केवळ त्याच नावाने अथवा नंबरवर आपली जपसंख्या नोंदविली की झालं. यामुळे आपल्याला जपाची नोंद करणे सोईचे होईल व आपण जपसंखेची काही वैशिष्ट्ये जाहीर करू शकू, उदा. लक्षणीय ठरलेला जप वगैरे. अर्थात नाव नोंदविलेच पाहिजे हे आवश्यक नाही. जप होणं महत्वाचे आहे. आपण व्हाट्सअॅप वर देखील पुढे जप नोंद करू शकता.


या संदर्भात काही चौकशी करायची असेल तर आपण चौकशी करू शकता.


जयंत वेलणकर

9422108069



⏭ चातुर्मास नाम जप नोंद लिंक.. https://forms.gle/7WZmdWfvZNj1E8Dm9



=============================================================

Above message posted on 11/7/2021 ======================================================



"श्री"

समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज उपासना केन्द्र,चातुर्मास नाम जप साधना वर्ष सहावे.

🙏जय गजानन🙏


आपण सर्व गजानन महाराजांचे उपासक! श्री गजानन महाराज उपासना केन्द्रांच्या माध्यमातून मागील पाच वर्षे दर चातुर्मासात 'गण गण गणांत बोते ' या सिध्द मंत्राचा जप करीत आहोत. मागील पाच वर्षे आपण अनुक्रमे खालील प्रमाणे जप केला आणि दरवर्षी आपण हा जप रीतसर पणे शेगांवला महाराजांच्या चरणी समर्पित करीत आहोत.

  • 2016 वर्ष पहिले सव्वा सहा कोटी

  • 2017 वर्ष दुसरे सव्वा तेरा कोटी

  • 2018 वर्ष तिसरे पंचावन्न कोटी

  • 2019 वर्ष चार एकशे अकरा कोटी

  • 2020 वर्ष पाच शंभर कोटी

आपण दरवर्षी उपासकांना छापील फाॅर्म वितरित करीत आलो, पण मागील वर्ष थोडं विपरीत असल्याने फाॅर्मचं वाटप आणि फाॅर्म परत येणं, समाधान कारक झालं नाही अर्थात त्यामुळेच जपसंख्या थोडी कमी झाल्याचं दिसतंय. यंदाची स्थिती लक्षात घेता आपण फाॅर्म न छापण्याचा निर्णय घेत आहोत.

2021चा चातुर्मास आषाढी एकादशी दि 20जुलै मंगळवार ते कार्तिकी एकादशी 15नोव्हेंबर सोमवार

या चातुर्मासात आपण गजानन महाराजांच्या या नामजपात सहभागी होऊ इच्छित असल्यास कृपया खालील बाबी ध्यानात घ्या..

1) संपूर्ण चातुर्मासात रोज ' गण गण गणांत बोते' या मंत्राचा निदान एक माळ जप करावा (१०८ची एक माळ)

2) जास्तीत जास्त आपण कितीही माळा जप करू शकता.

3) हा जप दिवसभरात केव्हाही, कुठेही, कितीही माळा सहज भावनेत आनंदाने करावा.

4) आपण रोज किती माळ जप केला त्याची तारीख वार नोंद ठेवावी.

5) चातुर्मासाच्या शेवटी आपला एकूण जप, आपले नाव, गाव, मो. क्रमांक व एकूण जप संख्या या क्रमाने खालील फोन नंबरवर व्हाट्सअॅप द्वारे कळवावा.

6) शेवटी या संपूर्ण जपाची एकूण बेरीज करून जप रीतसर शेगांवला महाराजांच्या चरणी समर्पित करण्यात येईल व सर्वांना जपसंख्या कळविण्यात येईल.

7) जपास प्रारंभ करताना प्रथम महाराजांना विश्वकल्याणासाठी प्रार्थना करून संकल्प पूर्वक जपास प्रारंभ करावा.

8) माळ हातात घेतलीच पाहिजे असंही नाही. दोन मिनिटात एक माळ जप होतो हे ध्यानात घेतलं की झालं.

9) सोबत या वर्षीच्या फाॅर्मची पीडीएफ पाठविण्यात येत आहे. त्या वरून आपण झेराॅक्स करून घेऊ शकता म्हणजे तारीख, नोंद व रेकाॅर्ड ठेवणे सोईचे होईल.

10) हा जप आपण अन्य कुणासाठी करीत नसून, स्वतः साठी आणि महाराजांसाठी करीत आहोत हे ध्यानात घ्यावं. ज्याचं त्याचं पुण्य ज्याला त्याला लखलाभ.

11) मात्र असं असलं तरी सामुहिक उपासनेची शक्ती प्रत्येकाला प्राप्त होणार आहेच.

तेव्हा जास्तीत जास्त उपासकांपर्यंत हा मेसेज पोहोचवून जास्तीत जास्त गजानन महाराज भक्तांना या चातुर्मास नाम जप साधनेचा आनंद प्राप्त करून द्या.

आपला एकूण जप किती होणार ते आपण महाराजांवर सोडून देऊ आणि चातुर्मासात नामजपाच्या या माध्यमातून भक्ती रसात रंगून जाऊ!

या संदर्भात काही शंका असल्यास आपण निसंकोचपणे विचारू शकता किंवा मेसेज करू शकता.

🙏जय गजानन 🙏

जयंत वेलणकर

9422108069




Recent Posts

See All
श्री गजानन महाराज सामूहिक उपासना

"श्री " जय गजानन *समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची सामूहिक उपासना* इ.स.२०१४ मधे श्री गजानन महाराजांच्या कृपेने मनात एक विचार आला. तो...

 
 
 
चातुर्मास नाम जप साधना - 2020 -चातुर्मास नाम जप सांगता (चातुर्मास समाप्ती)

"श्री" 🙏जय गजानन चातुर्मास नाम जप साधना २०२०,जप संख्या जय गजानन!हे चातुर्मास नाम जप साधनेचे पाचवे वर्ष होते. मागील चार वर्ष समर्थ...

 
 
 
श्री गजानन महाराजांचं आवडतं भजन

चंदन चावल बेल की पतीया हे भजन गजानन महाराजांचं आवडतं भजन हे आपण वाचलं आहे. पुढील ओळीमध्ये शब्द आहेत ए दुःख मेरा हरो, तसं तर नेहमी करीताच...

 
 
 

Comments


9892909088

©2020 by Vijaya Mahavir Bhattad. Proudly created with Wix.com

bottom of page