top of page

चातुर्मास नाम जप साधना - 2024

Updated: Jul 9, 2024


चातुर्मास नाम जप साधना – 2024    


"श्री "

🙏गजानन महाराजकी जय! 🙏जयगजानन 



नामजप साधनेचा ९ चातुर्मास प्रारंभ आषाढी एकादशी 🌸 दिनांक 17 July 2024 पासून ( समर्थ सद्गुरू श्रीगजानन महाराज उपासना केन्द्र नागपूर)

🪷आपण यानामजपात सहभागी होऊ शकता.

🪷 मागील आठ वर्षांपासून आपण नामजप नोंदणी फाॅर्म छापून त्या द्वारे नामजपाची नोंद घेत आलो आहोत.

🪷 याफाॅर्म मधे काय आहे?

१. नामजपा विषयीप्राथमिक माहिती व मागील वर्षांचीआकडेवारी.

२. साधकाला नामजपनोंद करणे सोईचे व्हावे म्हणून, आषाढी ते कार्तिकी तारीखवारजपसंख्या नोंदीसाठी तालिका 

३. सामुहिक उपासनेचे महत्व 

४. चातुर्मास समाप्तीनंतर नामजप समर्पित करण्यासाठी सूचना व जप समर्पणप्रार्थना 

५.आपणास गावोगावीवा घरोघरी समर्थ सद्गुरू श्रीगजानन महाराज उपासना सुरू करावयाची असल्यास थोडक्यात माहिती 

🪷आतापर्यंततीस चाळीस गावातून फाॅर्म पोहोचलेत. आपल्या गावात दहावीस भक्तांचा गट 

' गणी गण गणांत बोते ' या सिध्द मंत्राचा जप करण्यास तयारअसल्यास आपण आपला पूर्ण पत्ता पिन कोड व फोननंबर सहपाठविल्यास स्पीडपोस्टने फाॅर्म आपणास घरपोच मिळतील 

🪷 आपणाजवळ फाॅर्म नसेल, माळ नसेल तरीही आपण जप करू शकता.

🪷 घरीवा सामुहिक जप करून एकूणआकडेवारी चातुर्मास समाप्ती नंतर (२३ नोव्हेंबर) कळवावी.

🪷 हासंपूर्ण जप शेगांवला महाराजांच्याचरणी समर्पित करण्यात येतो.

🪷 सोबत जप नोंदणी साठीलिंक देत आहे त्याचाही फायदा आपण करून घेऊ शकता.

🪷 याचलिंक मधे फाॅर्मची पीडीएफ देत आहे. त्याद्वारे आपण प्रिंटआऊट काढून झेराॅक्स काढून घेऊ शकता 

🪷 याचातुर्मासात ज्याला, जेव्हा, जितका जप रोज करणेशक्य आहे तेवढा जप सहजपणे करायचाआहे.

🪷 याशिवाय या चातुर्मासात आपणशक्य असल्यास रोज संध्याकाळी साधारण सात च्या सुमारास ' समर्थ सद्गुरू श्रीगजानन महाराज उपासना यूट्युबच्या माध्यमातून ऐकून करू शकता' घरी, दारी प्रवासात वा कुठेही याउपासनेच्या माध्यमातून गजानन महाराजांचं स्मरण निश्चित होणार आहे. Link - 


🪷 जास्तीतजास्त जप करा वमहाराजांच्या चरणी समर्पित करून स्वतः साठी पुण्य जोडा! बाकी गजानन महाराज समर्थ आहेतच.

काही शंका असल्यास🌹 स्वागत! 🙏जयगजानन 


🌺जयंत वेलणकर 

नागपूर 9422108069


नाम जप नोंद लिंक ===>




समर्थ सद्गुरू श्रीगजानन महाराज उपासना===>



फाॅर्म पीडीएफ

चातुर्मास नाम जप साधना-2024



.......................

 
 
 

Recent Posts

See All
🌺अनुभव १७५🌺 हाकेला धावणारा देव

" श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १७५) हाकेला धावणारा देव जय गजानन! मागील पंचवीस तीस वर्षांच्या काळात अनेक ठिकाणी गजानन महाराजांची...

 
 
 

Comentarios


9892909088

©2020 by Vijaya Mahavir Bhattad. Proudly created with Wix.com

bottom of page