चातुर्मास समाप्ती, कार्तिकी एकादशी दि १५ नोव्हेंबर २०२१ (🌸वर्ष सहावे)
- Jayant Velankar
- Nov 12, 2021
- 2 min read
Updated: Nov 14, 2021
"श्री"
🙏 जय गजानन!
चातुर्मास समाप्ती, कार्तिकी एकादशी दि १५ नोव्हेंबर २०२१ (🌸वर्ष सहावे)
आपण सध्या चातुर्मासात ' गणी गण गणांत बोते ' या सिध्द मंत्राचा जप करीत आहोत. दि १५ नोव्हेंबरला चातुर्मास संपतो आहे. आता जपसंख्या एकत्रित करणे सुरू होईल. यंदा आपण फाॅर्मची केवळ पीडीएफ पाठविली होती. त्यावरून ज्यांना शक्य झालं त्यांनी फाॅर्मची प्रिंटआऊट काढून घेतली आहे. काहींजवळ फाॅर्म नाही मात्र जप होतो आहे. आता आपल्याला जप समर्पित करायचा आहे आणि आपली जपसंख्या कळवायची आहे.
जप समर्पण
चातुर्मास संपल्यावर आपला जप महाराजांना कृपया पुढीलप्रमाणे समर्पित करावा.
महाराजांसमोर बसून प्रथम गणी गण गणांत बोते चा एक माळ जप करावा. नंतर पुढील प्रार्थना मोठ्याने म्हणून जर फाॅर्म असेल तर तो महाराजांच्या चरणी ठेवावा. फाॅर्म नसेल तर मनोमन प्रार्थना पूर्वक जप समर्पित करतो आहे अशी मनात कल्पना करावी.
जप समर्पण प्रार्थना
समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या कृपेने,आशीर्वादाने आणि प्रेरणेने या चातुर्मासात आम्ही सर्व उपासकांनी 'गण गण गण गणांत बोते 'या सिध्द मंत्राचा यथाशक्ती जप केला. आज आम्ही हा जप विनम्रपणे महाराजांच्या चरणी अर्पण करतो आणि आम्हा सर्व उपासकांवर कृपादृष्टी ठेवून,त्यांनी सर्व विश्वाचं कल्याण करावं अशी त्यांना प्रार्थना करतो.
जपसंख्या कळविणे
दि २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या दरम्यान आपल्या नावासह आपला एकूण जप, व्हाट्सअॅप वर खालील नंबर वर कळवावा. किंवा ज्यांना शक्य होईल त्यांनी दिलेल्या लिंकवर नाव नंबर सह कळवावा. ( आपला जप नंबर वर किंवा लिंक वर कुठेतरी एकाच ठिकाणी नोंदवायचा आहे)
गणी गण गणांत बोते मंत्रावर विस्तृत लेख
'गणी गण गणांत बोते' मंत्रावर विस्तृत विश्लेषणात्मक लेख जो अमेरिकेत गजानन महाराज भक्त संमेलनात वाचण्यात आला, तो व्हाट्सअॅप वर नुकताच प्रसिद्ध झाला हे आपणास माहीत आहेच .मात्र असे मोबाईल मधील लेख मागे पडून गहाळ होतात हे लक्षात घेऊन, हा संग्राह्य लेख छापील रुपात जिज्ञासू भक्तांना अभ्यासासाठी उपलब्ध असावा असे जाणवल्याने तसा तो उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. अपेक्षा एवढीच की, तो स्वतः मनापासून वाचून निदान पाच दहा जिज्ञासू भक्तांपर्यंत आपण तो पोहोचवावा. अशा भक्तांनी इच्छा व्यक्त केल्यास व त्यांचा पत्ता कळविल्यास लेखाच्या पाच दहा काॅपीज त्यांना पाठविता येतील. अर्थातच विनामूल्य!(पत्ता याच नंबर वर कळवावा)
कृपया दखल घ्यावी. स्वागत आहे!(जप करणार्या भाविकांपर्यंत हा संदेश पोहोचविण्यात सहाय्य करावे.)
जप नोंदणीसाठी लिंक.....https://forms.gle/E7rHBf4trr52jM1GA
🌺जयंत वेलणकर , 9422108069
Comments